सवय नसते घरी एकट राहण्याची🙃
सवय नसते घरी एकट राहण्याची🙃
आईबाबा शाळेला जाताना नरोप घेण्याची,
जाताना शांततेत जा सांगण्याची,
घरी केव्हा परत याल विचारण्याची,
सवय नसते घरी एकट राहण्याची.
घरी आलेल्या पाहुण्याला पाणी विचारण्याची,
गच्ची वरती आलेल्या माकडांना हकलण्याची,
पाऊस आला तर सुखत टाकलेले कपडे आणण्याची,
सवय नसते घरी एकट राहण्याची.
इस्त्री वाल्या काकांना कपडे मोजून देण्याची,
भाजी वाल्या काकू सोबत तडजोड करण्याची,
काम वाल्या काकू सोबत गप्पा मारण्याची,
सवय नसते घरी एकट राहण्याची.
बोर झालं तर इंस्टा स्क्रोल करण्याची,
Netflix वरती random series बघण्याची,
Tmkoc बघत जेवण्याची,
सवय नसते घरी एकट राहण्याची.
काही आवाज झाला तर पटकन उठून बघण्याची,
भीती वाटली तर पणुला व्हिडिओ कॉल करण्याची,
बाहेर जायचं असेल तर घर लॉक करण्याची,
सवय नसते घरी एकट राहण्याची.
५वाजता आईबाबा घरी येतील या विचाराने आनंदी होण्याची,
सायंकाळी देवा समोर दिवा लावण्याची,
आई बाबाला उशीर होईल म्हणून स्वयंपाक करण्याची,
सवय नसते घरी एकट राहण्याची.
सोपं नसत घरी एकट राहण,
सर्व घराची जिम्मेदारी स्वतः वरती घेणं.

Comments
Post a Comment