गरज नाही या नात्याला नाव देण्याची!😊💞

 



गरज नाही या नात्याला नाव देण्याची!😊💞

तू आहेस माझा मी आहे तुझी,
गरज नाही या नात्याला नाव देण्याची.
तू नेहमी खुश असावं ही इच्छा आहे माझी,
गरज नाही या नात्याला नाव देण्याची. 
ओरडली, भांडली, रागावली तरी काळजी आहे मला तुझी, गरज नाही या नात्याला नाव देण्याची.
जी येईल तुझ्या आयुष्यात मला इच्छा आहे तिला बघण्याची,गरज नाही या नात्याला नाव देण्याची.
एकमेकांच्या आयुष्यात नसलो तरीराहुत एकमेकांसाठी, गरज नाही या नात्याला नाव देण्याची.
बघत असते मी वाट तुला भेटण्याची,
गरज नाही या नात्याला नाव देण्याची.
नेहमीची सवय झाली आहे एकमेकांपासून दूर राहण्याची,गरज नाही या नात्याला नाव देण्याची.
कधीतरी हिम्मत करत जा मला वाइट बोलण्याची, 
गरज नाही या नात्याला नाव देण्याची.
मला कळाली आहे प्रेम गाथा राधा आणि कृष्णा ची, म्हणून गरज नाही या नात्याला नाव देण्याची.
तू असतो म्हणून वेळ आली नाही कुणाला विश्वासात घेण्याची, गरज नाही या नात्याला नाव देण्याची. 
खूप इच्छा असते तुझ्यासाठी काहीतरी करण्याची,
गरज नाही या नात्याला नाव देण्याची.
 लोक नाव देतात कारण त्यांना भीती असते तुटण्याची,आपल्याला गरज नाही या नात्याला नाव देण्याची. 
रागावली म्हणून येते का मनात यादी शंकांची?
म्हणून वाटते का तुला गरज, या नात्याला नाव देण्याची?

- प्राची झोरे....

Comments

Popular posts from this blog

कॉलेज में दोस्त कैसे बने??

हॉस्टेल की गलिया!❤️